Madha Loksabha Election : माढ्यात विरोध कराल तर बारामतीत मदत होणार नाही!! खास विमानाने निंबाळकर नागपुरात दाखल, फडणवीस घेणार मोठा निर्णय… 


Madha Loksabha Election  : माढा लोकसभा मतदारसंघात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे आता ही जागा भाजपा गमवणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत. त्यांना उमेदवारी नको, अशी भूमिका त्यांनी पहिल्यापासूनच घेतली. यामुळे आता हा वाद फडणवीस यांच्याकडे गेला आहे.

याचा पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे खास विमानाने नागपूरकडे रवाना झालेत. त्यांची उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक आहे. यामुळे आता यामध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Madha Loksabha Election

भेटीसाठी गेलेले नेते यांनी तक्रार केली आहे की महायुतीत राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही. ही तक्रार खासदार निंबाळकर फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यावर आता फडणवीस कसा तोडगा काढणार हे लवकरच समजेल.

माढ्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही, अशी आक्रमक भूमिका खासदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. येथील आमदार राहुल कुल देखील सोबत गेल्याने याबाबत चर्चा वाढली आहे.

दरम्यान, खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!