Uruli Kanchan News : भर लग्नात नवरदेवाने मंगल कार्यालयाच्या मालकावर केले कट्यारीने वार, उरुळी कांचन येथे घडली भयंकर घटना, नेमकं काय घडलं?


Uruli Kanchan News : किरकोळ कारणावरून नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी करण दीपक सणस (वय २७, रा. उरुळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नवरदेव अभिजीत राजू मिरगणे, राहुल रमेश सरोदे, दत्ता यांच्यासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात दीपक सणस यांचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. विवाह समारंभानंतर वर अभिजीत मिरगणे आणि नातेवाईक रात्री साडेआठच्या सुमारास स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते.

त्यामुळे तेथून ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकवण्यास सांगितले.अभिजीत आणि मित्रांनी मंगल कार्यालयात गोंधळ घालून शिवीगाळ केली. Uruli Kanchan News

दरम्यान, याप्रकरणी सणस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, नवरदेव अभिजीत राजू मिरगणे, राहुल रमेश सरोदे, दत्ता यांच्यासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार रमेश गायकवाड करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!