Onion : कांदा प्रश्नावर अजूनही तोडगा नाहीच, कांदा लागला सडू, लिलाव अजूनही बंदच..


Onion मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटला आहे. सरकारकडून कांदाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याचं यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावा अशी मागणी सध्या कांदा व्यापाऱ्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेत. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर कांदा उत्पादक शेतकरी, कांदा व्यापारी, बाजार समितीचे सदस्य यांची बैठक पार पडली.

या बैठकीत केंद्रीय सचिव उपस्थित नसल्यामुळे तोडगा काढता आला नसल्याचे यावेळी अब्दुल सत्तार यांनी म्हटले तर २९ सप्टेंबरला पुढची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

दरम्यान, कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी.

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट ५ टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापा-यांना देण्यात यावी. अशा मागण्या सध्या कांदा व्यापा-यांकडून करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!