एकाच कुटुंबातील ५ जणांच्या गळ्यावरून फिरवला सुरा, पोटच्या मुलांनाही सोडलं नाही, हादरवणारी माहिती आली समोर…

उत्तर प्रदेश : गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठच्या लिसाडी गेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.
त्यामुळे घराला कुलूप लावून कुटुंब कुठं गेलं, हे कुणालाच माहीत नव्हतं. कुटुंबाला फोन लावला तरी समोरून कोणतंच उत्तर मिळत नव्हतं. अखेर मृत व्यक्तीच्या भावानं घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता सगळ्यांना धक्का बसला.
घरात मृत मोईन, त्याची पत्नी आणि ३ मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसले. हे कुटुंब कालपासून बेपत्ता होते. आज त्याच घरात त्यांचे मृतदेह सापडले. यातील पती-पत्नीचे मृतदेह चादरीत गुंडाळलेले आढळले. तर मुलांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळले. घरात सर्वत्र वस्तू विखुरलेल्या होत्या. घरात सगळीकडे रक्ताचे डाग पसरलेले होते. फोनही बंद होता.
दरम्यान, प्राथमिक तपासात पाचही जणांचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघड झाले. पती पत्नीची हत्या करून त्यांचे मृतदेह चादरीत गुंडाळले होते. तर मुलांचे मृतदेह एका पोत्यात भरून ते बेडमध्ये लपवण्यात आले होते. एकाच कुटुंबातील पाच जणांची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे