वाघोली -लोहगाव रस्त्यावर १ किलो ११२ ग्रॅम आफिम जप्त ! अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई ….

लोणी काळभोर : अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणेच्या पथकाने एका परप्रांतीयास जेरबंद करुन २२ लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये २२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा १ किलो ११२ ग्रॅम आफिम या अंमली पदार्थांचा समावेश आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी तुलसिदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. पोस्ट वरणी, तहसिल वल्लभनगर, जि, उदयपुर, राज्य राजस्थान) याला जेरबंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील सविस्तर हकीकत अशी की शुक्रवार (१० ऑक्टोबर) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना लोहगाव वाघोली रोड, पुणे येथील शिवकरवस्ती, लोहगाव वाघोली रोड, शिवरकर कॉम्लेक्स, शॉप २० समोरील मोकळ्या जागेत लोहगाव वाघोली रोड पुणे येथे एक इसम हा काळया रंगाची सँक खांदयास अडकवुन कोणाचीतरी वाट पाहत संशयितरित्या उभा असल्याचे दिसले. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार त्याचे बाजुने जात असताना त्याने पळुन जाण्याचा पर्यंत करीत असताना त्यास पाठलाग करुन पकडण्यात आले. त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याची व त्याच्या ताब्यातील काळया रंगाच्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये २२ लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. त्यामध्ये २२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा १ किलो ११२ ग्रॅम आफिम या अंमली पदार्थांचा समावेश आहे. याचबरोबर १५ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व २०० रुपये किंमतीची एक काळया रंगाची सँग असा ऐवज मिळुन आला.

सदर आरोपी विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक हवाले हे करीत आहेत.वरील नमुद कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहाय्यक पालीस आयुक्त, गुन्हे १ विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस अंमलदार सचिन माळवे, विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, संदिप शिर्के, दयानंद लंगे, विपुन गायकवाड, संदेश काकडे व दत्ताराम जाधव यांनी केली आहे.

