Zika Virus : झिका व्हायरसने उडवली नाशिककरांची झोप! प्रशासन अलर्ट मोडवर, घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू..


Zika Virus : केरळमधील कोविडच्या वाढत्या प्रकरणांनी आधीच देशभरात चिंता वाढवली असताना, आता महाराष्ट्रातील नाशिक शहरात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्यानंतर ही चिंता दुपटीने वाढली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे.

तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात व्हायरसबाबत अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. Zika Virus

नाशिक महापालिकेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ३४८० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १५, ७१८ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. २३ गर्भवती महिलांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात झिका डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधले जात आहेत.

आतापर्यंत ५७,२१७ प्रजनन बिंदूंची तपासणी करण्यात आली आहे.स्वच्छ पाणी उघड्यावर साठू देऊ नये, असे आवाहन नाशिक महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना केले आहे. उघड्या पाण्याचे स्त्रोत झाकून ठेवा.

झिका व्हायरसला घाबरण्याची गरज नाही, सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. दुसरीकडे झिका बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

झिकाची लक्षणे काय?

झिका संसर्ग डासांच्या चाव्याव्दारे पसरतो त्यामुळे जर तुम्हाला डास चावला तर उलट्या होणे
ताप येणे
चिंताग्रस्त आणि अस्वस्थ वाटणे
खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!