Yuvraj Pathare : अहमदनगर हादरले! शिवसेना नगरसेवकाच्या छातीला गावठी कट्टा लावला, अन्…, घटनेने उडाली खळबळ


Yuvraj Pathare : राज्यात गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीयेत. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही शस्त्रांचा वापर होताना दिसत आहे. किरकोळ वादातूनही थेट गोळीबार करून विरोधकांना संपविण्याचे प्रकार होत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये भर दिवसा नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वसेनेचे नगरसेवक युवराज पांढरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पारनेर शहरातील मुख्य परिसरातील हॉटेल दिग्विजय मध्ये युवराज पठारे आपल्या समर्थकांसोबत येत होते . यावेळी ते येण्याआधी काही तरुण त्या ठिकाणी येऊन बसले होते. Yuvraj Pathare

यानंतर पठारे हॉटेलमध्ये येताच त्या ठिकाणी बसलेल्या तरुणांपैकी एकाने उठून गावठी कट्टा पठारे यांच्या छातीला लावला. यावेळी पिस्तुलाचा खटका आरोपीने दाबला मात्र फक्त आवाज झाला गोळी चालली नाही.

दरम्यान, यानंतर त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आणि पठारे यांच्या समर्थकाने कट्टा हिसकावून घेतला पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सोबत असलेले दोघेजण त्या ठिकाणाहून पळून गेले आहेत. तेथील उपस्थितांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांकडे दिले असून आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!