तुमच्या मोठ्या व्यवहारांवर असते आयकर विभागाचे लक्ष, ते कसे ट्रॅक केले जातात? वाचा महत्वाची माहिती…

मुंबई : आयकर हा जास्त उत्पन्न असणारांसाठी एक महत्वाचा विषय आहे. यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण आयकर विभाग अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवतो. जर तुमचे उत्पन्न आणि व्यवहारांनी दाखवलेल्या जीवनशैलीमध्ये काही फरक आढळला तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. बँकांच्या माध्यमातून आयकर विभाग तुमच्या उत्पन्नावर आणि खर्चावर बारीक लक्ष ठेवतो. सर्व बँकांनी काही महत्त्वाच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. नाहीतर कारवाई होऊ शकते. तुम्ही तुमच्या बचत खात्यात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँक त्याची माहिती आयकर विभागाला देते.
याबाबत तुमच्याकडे माहिती असणे गरजेचे आहे. करंट अकाउंटमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे, क्रेडिट कार्डद्वारे वर्षातून १० लाख रुपयांचे पेमेंट करणे, म्युच्युअल फंड, डिबेंचर, शेअर्समध्ये आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणे इत्यादी सर्व गोष्टींवर आयकर विभाग लक्ष ठेवतो.
दरम्यान, करदात्यांनी नोटीस टाळण्यासाठी सर्व नोंदी पूर्ण आणि अचूक ठेवा. वेळेवर रिटर्न भरत रहा. करमुक्त उत्पन्नासह उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड करा आणि बँक स्टेटमेंट, इनव्हॉइस आणि निधीच्या स्रोतांचा पुरावा यासारखी कागदपत्रे ठेवा. यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही.
दरम्यान, जर तुम्हाला नोटीस मिळाली असेल तर ती काळजीपूर्वक वाचा. नंतर पारदर्शक उत्तर द्या. जर काही समस्या असेल तर तुम्ही सीएव्हीकडून सल्ला देखील घेऊ शकता. यामुळे जे काही असेल त्याबाबत व्यवस्थित माहिती तुम्ही घ्या. असा सल्ला तज्ञ देतात.