१ जुलैपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम, आताच वाचा नाहीतर होईल नुकसान…


पुणे : जुलै महिना तुमच्या आयुष्यात अनेक बदल घेऊन येणार आहे. जुलै महिन्यात अगदी तुमच्या खिशापासून ते स्वयंपाक घरापर्यंत आणि मोबाईल बँकिंगपासून अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

रेल्वे भाड्यापासून ते आधार लिंकिंग, बँक व्यवहारांपासून ते CNG दरांपर्यंत अनेक गोष्टीत बदल होणार आहेत. 1 जुलैपासून लागू होणाऱ्या या 5 प्रमुख बदलांमुळे घरगुती बजेट आणि प्रवासाचे नियोजन यावर मोठा परिणाम होणार आहे.

तात्काळ तिकीटसाठी आधार अनिवार्य…
IRCTC तर्फे 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार लिंक असलेला अकाउंट बंधनकारक केला जाणार आहे. 15 जुलैपासून OTP प्रणाली लागू होईल, ज्यात आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर आलेला OTP टाकल्याशिवाय तिकीट बुकिंग होणार नाही. तसेच, अधिकृत एजंट्सना पहिल्या 30 मिनिटांत तिकीट बुक करता येणार नाही.

CNG-PNG दरांमध्ये बदल संभवतो…
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर बदलतात. जुलैमध्ये CNG आणि PNGचे दर वाढणार की नाही, याबाबत सध्या अनिश्चितता आहे. दरवाढ झाल्यास गृहिणींच्या बजेटवर ताण येण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रवास महागणार, वेटिंग तिकीटही मर्यादित..
भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रति किमी 1 पैसा आणि एसी क्लाससाठी 2 पैसे वाढ होणार आहे. तसेच, प्रत्येक क्लासमध्ये वेटिंग तिकीटांची संख्या 25 टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे.

पॅन-आधार लिंकिंग बंधनकारक…
नवीन पॅन कार्डसाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारने अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित केली आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही पॅन-आधार लिंकिंग केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे.

बँकिंग व्यवहार महागणार… 

HDFC बँकेने थर्ड पार्टी ॲप्सवरून क्रेडिट कार्ड बिल भरताना 1% शुल्क लागू केलं आहे. याशिवाय, गेमिंग, वॉलेट अपलोड आणि युटिलिटी बिलांवरही अतिरिक्त शुल्क लागणार आहे. ICICI बँकेने देखील ATM व्यवहार मर्यादित केले असून, 3 ते 5 व्यवहारांनंतर प्रत्येक वेळी 23 रुपये शुल्क लागेल. बॅलन्स तपासणीसाठी 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!