Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार, निवडणूक आयोगाकडून शोधाशोध सुरू, बारामतीत मोठा राडा…


Yugendra Pawar : राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली आहे.

विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.

अशातच युगेंद्र पावरांच्या शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर लगेच, निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे पैसै वाटप होत असल्याबाबत तक्रार आली होती. त्यानुसार आम्ही शरयू माटार्स या ठिकाणी तपासणी केली होती. पण त्या ठिकाणी आम्हाला काहीही आढळून आले नसल्याचे नावडकर म्हणाले आहे . Yugendra Pawar

बारामती शहरापासून जवळस असलेले शरयू मोटार्स आहे. या ठिकाणी पैसाचं वाटप चालु असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले असता त्यांना काहीच आढळून आले नाही. याबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री साडेदहा वाजता १० ते १२ अधिकारी आले होते. त्यांनी सगळे सर्च ऑपरेशन केलं. त्यांना इथं काहीही मिळालं नाही. त्यांना आण्ही सहकार्य केल्याचे युगेंद्र पवार म्हणाले.

याबाबत मला काहीही माहित नाही. तक्रार कोणी दिली हे आम्ही विचारले पण त्यांनी काहीच माहिती दिली नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. जोपर्यंत काही फॅक्ट्स समोर येत नाहीत, त्यामुळे त्याबाबत बोलणंयोग्य होणार नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. होणाऱ्या सगळ्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार असल्याचे युग्रेंद्र पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!