Yugendra Pawar : अजित पवारांच्या अडचणीत वाढ, आता अजून एक पुतण्या करणार सुप्रिया सुळे यांचा प्रचार..

Yugendra Pawar : राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना धक्क्यांवर धक्के दिले आहेत. अशातच आता अजित दादांना घरातूनच विरोध असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता शरद पवार यांच्यासोबतच जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्या युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष अँड. संदीप गुजर यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजिव असून ते सक्रीय राजकारणात नाहीत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. Yugendra Pawar
व्यावसायिक जबाबदाऱ्या ते सांभाळतात. पण आता ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.म ध्यंतरी बारामतीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपले कुटुंब एकटे पडले असल्याचा उल्लेख केला होता, त्यांचे सख्खे पुतणेच आता शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.