राजकारणात खळबळ! महिला आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप; दिल्लीहून स्क्रिप्ट…


पुणे : महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका करत त्यांना ‘महिला विरोधी’ ठरवल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. फडणवीस हे सुशिक्षित आणि अभ्यासू नेते असल्याने त्यांच्याकडून वेगळ्या भूमिकेची अपेक्षा होती, असे त्या म्हणाल्या.

एनडीए आघाडीतील सर्व पक्षांना दिल्लीहून ‘नोट’ किंवा ‘ब्रिफिंग’ पाठवले जाते आणि त्याच दबावाखाली मुख्यमंत्री स्क्रिप्टेड विधाने करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’चा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी सरकारला अनेक कठोर प्रश्न विचारले आहेत.

त्यांनी सांगितले की, हे महिला आरक्षण विधेयक २० सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत, २१ सप्टेंबरला राज्यसभेत एकमताने मंजूर झाले आणि २८ सप्टेंबरला राष्ट्रपतींचीही त्यावर स्वाक्षरी झाली. त्यामुळे या सर्व प्रक्रियेची पूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, २०२४ पासून लागू होण्याची अपेक्षा असलेले हे आरक्षण २०२६ उजाडले तरी प्रत्यक्षात का लागू झाले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यांचा नेमका संबंध काय, तसेच राज्यांमध्ये ५० टक्के जागा वाढवण्याबाबत केलेल्या घोषणेचा विधेयकात उल्लेख का नाही, असेही प्रश्न त्यांनी विचारले. याचबरोबर, कोणत्याही अटींशिवाय सध्याच्या ५४३ लोकसभा जागांवर तत्काळ ३३ टक्के महिला आरक्षण लागू करावे, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षांमुळे लोकशाहीतील महिला सहभागाचा मृत्यू झाला, या टीकेला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे यांनी सरकारलाच कोंडीत पकडले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला त्यांनी ठामपणे विरोध केला.

मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत असे मला म्हणायचे नाही, पण या संपूर्ण विषयावर त्यांच्यासोबत समोरासमोर बसून चर्चा करण्यास मी पूर्णपणे तयार आहे,” असे त्या म्हणाल्या. यासोबतच, देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेल्या कोणत्याही ठिकाणी आणि वेळेला येण्यास आपण तयार असल्याचे सांगत सुळे यांनी त्यांना खुले आव्हान दिले असून, त्यांचा राजकीय सामना स्वीकारल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!