युवा कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण; जिल्हा परिषदेचा धक्कादायक दावा


सांगली : ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान….’अशी टॅगलाईन घेऊन महायुती सरकार सत्तेत आल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येनंतर आता सरकारची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीड कोटींच्या थकीत बिलासाठी युवा कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हर्षल पाटील असं त्यांचं नाव आहे.या आत्महत्ये नंतर विरोधकांनीं टिकेची झोड उठवली आहे. त्यातच आता याप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेने मोठा दावा केला आहे.

हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचा संदर्भात सांगली जिल्हा परिषदेने खुलासा केला आहे. हर्षल पाटील यांनी सांगली जिल्ह्या अंतर्गत जलजीवन मिशनचं काम घेतल नाही. त्यासंदर्भात कोणताच करारनामा झालेला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या खोट्या आहेत असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कंत्राटदार हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या जलजीवन योजनेतून कामे केली..मात्र राज्य सरकारकडून बिले वेळेत न मिळाल्यामुळे आपल्या जीवनाचा शेवट केला. दरम्यान शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रमाणे आता कंत्राटदारांच्या आत्महत्येची देखील मालिका सुरू होईल अशी भीती आता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!