निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या चार पैकी दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद…


लोणी काळभोर : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा असा आरडाओरडा करत चार जणांनी एका हॉटेलमध्ये पिस्तूल, चाकूसह दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सुर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय ४०, रा. मांजरी खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रणवराज सुनिल यादव (वय २५, रा. मांजरी ग्रीन ॲनेक्स बिल्डिंग, फ्लॅट क्रमांक ४०५, मांजरी बुद्रुक) आणि जय गणेश शेलार (वय २५, रा. पवार रेसिडेन्सी, बॉयज होस्टेल, १५ नंबर, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारांस हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “माईलस्टोन 09” हॉटेलमध्ये चार जणांनी पिस्टल व धारदार शस्त्रे हातात घेऊन जबरदस्तीने प्रवेश करत दहशत माजवली होती. “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा होता” अशी धमकी देत हॉटेलमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस मांजरी परिसरात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आरोपी प्रणवराज यादव व जय शेलार हे धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन ॲनेक्स परिसरात थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुखपोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, पोलीस हवालदार घावटे, कुसाळकर, आढारी, महाजन, राऊत, पोहवा, शेख, परीट, राक्षे, पोलीस अंमलदार पाटील, खराडे, खरात, शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!