हवेलीत गोते मळा येथे सेंद्रीय शेतीचे प्रयोग बघायला मिळणार, ‘राम कृष्ण हरी’ शेती फार्मवर शिवार फेरीचे आयोजन..

उरुळी कांचन : शेतकरी हे शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. आता सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. 30 मे रोजी बिवरी,गोतेमळा (ता.हवेली) येथील शेतकरी संतोष गोते व कालिदास नलगे यांच्या संकल्पनेतील गोआधारित सेंद्रिय शेतीचे उत्कृष्ठ शेती मॉडेल पाहवयास मिळणार आहे.
सेंद्रिय शेती करणारे शेतकरी संतोष गोते यांच्या राम कृष्ण हरी या गोआधारीत शेती फार्मवर शिवार फेरी चे नियोजन करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेती कशी असते, हे बघायला मिळणार आहे. शाश्वत सेंद्रिय शेती किती सोपी व सुलभ आहे हे ज्यांना जवळून अनुभवायचे व पाहायचे असेल तर त्यांनी आवर्जून एकदा गोते महाराजांचे शेतीस भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती कशी करता येते हे अनुभव घेता येतील व आपल्या मनातील शंका दूर होतील. विविध प्रकारच्या सेंद्रिय शेतीतील पद्धतीने त्रासून गेलेले शेतकऱ्यांसाठी गोते महाराज यांचे शेतात एक शिवार फेरी व त्यावर चर्चासत्र 30 मे ला घेण्यात येणार आहे. ही शिवार फेरी व चर्चासत्र आजतागायत न घडलेले चर्चासत्र असणार आहे कारण येथे कोणीही वक्ता नाही.
येथे फक्त येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शंकेचे चर्चासत्रात निरसन केले जाईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे चर्चा सत्र व शिवार फेरी ही माननीय गोते महाराज यांचे संकल्पनेतून व राम कृष्ण हरि सेंद्रिय शेती ग्रुप मधील सर्वांच्या सहकार्यातून होत आहे या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी एकदा अवश्य लाभ घ्यावा आपल्या इतर शेतकऱ्यांनाही कळवावे कारण कोणत्याही प्रकारची संधी हे आयुष्यात एकदाच येते.
कार्यक्रमाचे ठिकाण..
राम कृष्ण हरि सेंद्रिय शेती फार्म, ह.भ.प. संतोषजी गोते महाराज, गोते मळा (ता. हवेली जी.पुणे )
संतोष गोते 9422558975,
7020394303
कालिदास नलगे :-9890984066
जगन्नाथ मगर :-8668306835
विलास टेकाळे 9579740417