सोलापुरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस, आरोपीला अटक….


सोलापूर : काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तीव्र निषेध केला जात आहे. असे असताना हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, हा युवक करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे राहतो. याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली. वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर असिफ शेख याच्याविरोधात करमाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत म्हटले की, ‘मी राजुरी येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडीत वाळुंजकर याने मला सांगितले की मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे. माझ्या मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेष वाळुंजकर याच्याकडून मागवून घेतला. त्या स्टेटसच्या फोटोची पाहणी केली.

अजहर असिफ शेख रा. शेलगाव वांगी याने त्याच्या मोबाईलवर व्हॉटसअप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवून सामाजिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केला आहे. सोशल मीडियाच्या व्हाट्सअप अकाऊंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटसला ठेवून तेढ निर्माण केला आहे.

या विरुद्ध विहिंप, बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून याबाबत नागरिक आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!