दूध, साखरेनंतर आता कांद्यानेही रडवलं! महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका; जाणून घ्या आजचा भाव


पुणे : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीनंतर आता दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कांदा, दूध, साखर आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सण-उत्सवाच्या तोंडावर घरखर्चाचं गणित बिघडलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा मोठा भार पडत आहे.

कांद्याच्या दरात वर्षभरात मोठी वाढ

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी दिल्लीत कांद्याचा किरकोळ दर ६२ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात कांदा सुमारे ३३ रुपये किलो होता. म्हणजेच एका वर्षात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात देशातील घाऊक बाजारात कांद्याचा सरासरी दर सुमारे ३५ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे किरकोळ बाजारातील वाढीमुळे ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचाही फटका

इंधनाच्या वाढत्या किमतींचाही महागाईवर परिणाम होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतींवर होतो. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खर्चातही भर पडली आहे.

१ सप्टेंबरपासून दूध आणखी महागणार

मुंबईतील घाऊक बाजारात सध्या दूध ९३ रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. मात्र, १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात तब्बल ९ रुपयांची वाढ होणार असून, दर १०२ रुपये प्रति लिटरवर जाणार आहे.

गुरांचा चारा, पेंड आणि चुणीच्या वाढत्या किमतींचा परिणाम दूध उत्पादनाच्या खर्चावर होत असल्याने दूध उत्पादक संघटनेने दरवाढीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

साखरेच्या दरानेही वाढवली चिंता

सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असताना तिच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत साखरेचा भाव ६२ रुपये प्रति किलो झाला आहे. वर्षभरापूर्वी हा दर सुमारे ४५ रुपये किलो होता.

घरगुती बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने शुल्कमुक्त साखर आयातीला मंजुरी दिली आहे. दुसरीकडे, खाद्यतेलाच्या दरातही वाढ होत असून मोहरीच्या तेलाचा किरकोळ भाव २०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्याचं सांगितलं जात आहे.

LPG सिलिंडरही महागला

एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनेही सर्वसामान्यांच्या घरखर्चात भर पडली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात यावर्षी ७९ रुपयांची वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ८५३ रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता दिल्लीत ९४२ रुपये झाला आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी १,५८०.५० रुपये असलेला १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर आता २,७३८ रुपयांवर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

एकूणच, सणासुदीपूर्वी कांदा, दूध, साखर, खाद्यतेल आणि गॅसच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या घरखर्चाचं बजेट विस्कटण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!