१०वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांनो मे च्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार, येथे पहा तुमचा रिझल्ट..


पुणे : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

बारावीच्या २१ लाख विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे१० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे. मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आली. या निकालाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. १५ मे पर्यंत निकाल लागू शकतो. मात्र यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांचीही धडधड वाढली आहे.

यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत १२ वीची परीक्षा झाली होती.यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. तर इयत्ता १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली ती १७ मार्चपर्यंत होती.

विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मे महिना संपायच्या आतच दोन्ही (१० वी, १२ वी) इयत्तांचे निकाल लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठीही पुरेसा वेळ मिळेल.

दरम्यान, लवकर निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला वेळेवर सामोरे जाण्यास मदत होणार आहे. यापूर्वी, निकाल उशिरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया आणि पुरवणी परीक्षांसाठी कमी वेळ मिळत असे. मात्र यंदा तसे होणार नाही.

खालील संकेतस्थळांवर विद्यार्थी आपले निकाल पाहू शकतात..

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!