सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात भाव उतरले; आणखी स्वस्त होणार का? पाहा २२ अन् २४ कॅरेटचे दर


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष बाजारातील दरांकडे लागले आहे.

देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत नरमाई कायम आहे. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १४ हजार ७९० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवडाभरात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १२ हजार ५४० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ११ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे.

 

शहर २२ कॅरेट सोने २४ कॅरेट सोने
मुंबई  १,१४,६४० रुपये  १,२५,०७० रुपये
पुणे  १,१४,६४० रुपये  १,२५,०७० रुपये
दिल्ली १,१४,७९० रुपये १,२५,२२० रुपये
कोलकाता १,१४,६४० रुपये १,२५,०७० रुपये
चेन्नई १,१४,६४० रुपये  १,२५,०७० रुपये
बेंगळुरू १,१४,६४० रुपये १,२५,०७० रुपये

 

उच्चांकावरून सोन्याच्या दरात मोठी घसरण

यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १.८३ लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर जवळपास २९.३ टक्क्यांनी खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही हाजिर सोन्याचा भाव प्रति औंस ३,५१४.०८ डॉलरवर व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे ९.४ टक्क्यांची घट झाली.

चांदीचे दरही घसरले; किलोमागे २० हजारांची घट

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी चांदीचा दर प्रति किलो १ लाख ७४ हजार ९०० रुपयांवर आला आहे. गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची घट झाली आहे.

विशेष म्हणजे, २९ जानेवारी रोजी चांदीने प्रति किलो ४.०४ लाख रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत आतापर्यंत चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस ४०.९९ डॉलरवर आहे. त्यामुळे सोन्यासह चांदीच्या दरातील घसरणीकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!