बालेवाडी क्रीडा संकुलात सुनेत्रा पवारांचा अचूक नेम! पहिल्याच प्रयत्नात मिळवले १० पैकी १० गुण


पुणे : बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नेमबाजीचा अनुभव घेतला. यावेळी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात अचूक निशाणा साधत १० पैकी १० गुण मिळवले.

सुनेत्रा पवार या क्रीडा संकुलातील विविध विभागांची पाहणी करत असताना नेमबाजी विभागात पोहोचल्या. तेथे सराव करणाऱ्या लहान खेळाडूंनी त्यांना शूटिंग रायफल हातात घेऊन नेमबाजी करण्याची विनंती केली. खेळाडूंचा आग्रह मान्य करत त्यांनी रायफल हातात घेत लक्ष्यावर नेम साधला.

विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अचूक निशाणा साधत पूर्ण १० गुण मिळवले. त्यांच्या या कामगिरीनंतर उपस्थित क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. सुनेत्रा पवार यांच्या या नेमबाजीच्या अनुभवामुळे तेथे सराव करणाऱ्या लहान खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!