लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार असाल तर मग आमची मतेही परत करा!! मतांसाठी फसवलं आता बहिणी संतापल्या….


मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील करोडो महिलांना सरसकट दरमहा पंधराशे रुपये दिले अन् भरभरून मतेही मिळवली. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. पण आता अनेक अडचणी सरकारच्या पुढे आल्या आहेत.

आता शासनाच्या तिजोरीत खडखड असताना पैसे द्यायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच आता महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे महिलांची चिंता वाढली आहे. निवडणूक असल्याने सरकारने काही निकष न बघता पैसे दिले.

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची कोणतीही शहनिशा शासनाने न करता मतांच्या लालचे पोटी सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार असाल तर आमच्याकडून भरभरून घेतलेली मतेही परत करा असा इशारा कळंबोलीतील कल्पना हनुमंत मोटे या गृहिणीने दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

पंधराशे रुपये मिळालेल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला चांगलेच मतदान केले. राज्याच्या तिजोरीवर कित्येक लाखो कोटींचे कर्ज असतानाही राज्यकर्त्यांनी मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना देण्याची घोषणा केली. मात्र आता आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता लाडक्या बहिणींना सरसकट पैसे न देता त्यांच्याकडे दुचाकी चार चाकी गाडी नाही, संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही, अशाच महिलांना लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!