संत तुकाराम महाराज यांचे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन

पुणे : संत तुकारामांचे वंशज जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजारामुळे जयसिंग महाराज मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जयसिंग महाराज मोरे यांना राज्यभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
जयसिंग महाराज मोरे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वारकरी समाजातील अनेक प्रमुख लोक, तसेच विविध संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांनी त्यांना वारकरी समाजाच्या परंपरा आणि मूल्ये जपणारे खंबीर पुरस्कर्ते म्हणून त्यांचे स्मरण केले आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज यांचे ते दहावे वंशज, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे मोठे बंधू होते. जयसिंग महाराज मोरे यांनी वारकरी समाजातील अनेकांसाठी कार्य केले. तसेच अनेकांना मदत देखील केली. त्यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीचा प्रसारही मोठ्या तत्परतेने केला.
वार्षिक पालखी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या शेडगे दिंडी क्रमांक तीनचेही ते प्रमुख होते. जयसिंग महाराज मोरे हे वारकरी समाज आणि संतांना बदनाम करणाऱ्या वादग्रस्त साहित्याला तीव्र विरोध करत असत. अशा साहित्याविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांचा यावर गाढ अभ्यास होता.
त्यांनी वादग्रस्त साहित्याला तीव्र विरोध करत न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. यसिंग महाराज मोरे यांना राज्यभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.