आजारपणाचे कारण देत दौऱ्याला गैरहजर, अन् फॅशन शोमध्ये लावली हजेरी, धनंजय मुंडे यांचे फोटो झाले व्हायरल…

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे काल अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात गैरहजर होते. आपण आजारी असल्याचे सांगून त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. असे असताना मुंबईत गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी एका फॅशन शोच्या दरम्यान ते दिसून आले आहेत.
प्रकृती अस्वास्थामुळे मुंडे मंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमातून गायब झाले.
काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा आज बीडच्या दौऱ्यावर होते. मात्र, धनंजय मुंडे त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित नव्हते. प्रकृती अस्वास्थामुळे ते आज कार्यक्रमांना अनुपस्थित असल्याची माहिती अजितदादांनी दिली तसेच पंकजा मुंडेंनीही ते आजारी असल्याचे सांगितले होते.
असे असताना धनंजय मुंडे हे आदल्या रात्री मुंबईतील फॅशन शोमध्ये दिसले. या फॅशन शोमध्ये त्यांच्या मुलीने भाग घेतला असल्याने मुंडेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, अशी माहिती आहे. याचे फोटो आता समोर आले असून त्याची खूप चर्चा सुरु आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मुद्दाम बाजूला ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, माझी प्रकृती ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती. अशी पोस्ट त्यांनी केली होती.
दरम्यान, बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे. तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात लोकं आक्रमक झाले आहेत.