ऐतिहासिक वस्फ बोर्ड विधेयक लोकसभेत अखेर मंजूर! बहुचर्चित शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे विधेयकाविरोधात मतदान….

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलेले वक्फ दुरूस्ती विधेयक २०२५, बहुमताने मंजूर झाले आहे. १२ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्र उलटून गेल्यावर रात्री अडीच वाजण्याच्या आसपास हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं.
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सदर विधेयकाची गरज काय आहे यासंदर्भात बोलताना आपली बाजू ठोसपणे मांडली. त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेला ‘मुस्लिम-विरोधी’ विधेयक या युक्तिवादाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.
विरोधकांनी या विधेयकामध्ये सुचवलेले सर्व बदल फेटाळल्यानंतर आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने २८८ ते विरोधात २३२ मतं पडली. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेच्या पटलावर ठेवलं जाणार आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलेले वक्फ दुरूस्ती विधेयक २०२५, बहुमताने मंजूर झाले आहे. १२ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्र उलटून गेल्यावर रात्री अडीच वाजण्याच्या आसपास हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं.
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सदर विधेयकाची गरज काय आहे यासंदर्भात बोलताना आपली बाजू ठोसपणे मांडली. त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेला ‘मुस्लिम-विरोधी’ विधेयक या युक्तिवादाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.
विरोधकांनी या विधेयकामध्ये सुचवलेले सर्व बदल फेटाळल्यानंतर आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने 288 ते विरोधात 232 मतं पडली. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेच्या पटलावर ठेवलं जाणार आहे.