Yashwant Factory : ‘यशवंत’ कारखाना सुरू करण्यासाठी कोणात धमक आहे, हे ओळखून सभासदांनी मतदान करुन समोरच्यांचा अहंकार मोडून काढावा – माधवराव काळभोर यांचे आवाहन


Yashwant Factory उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याला आण्णासाहेब मगर शेतकरी सहकार पॅनेल हा सर्वनुमते व सर्वपक्षीय पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या कुटूंबांनी कारखाना उभारणीसाठी त्याग केला आहे अशा उमेदवारांना संधी मिळाली आहे. ज्यांच्यात कारखाना उभा करण्याचे बाळकडू आहेत. तेच उमेदवार नव्याने कारखाना उभा करण्यास आपले योगदान उभे करतील असे आमचे उमेदवार आहेत, उलट विरोधात ज्यांनी बाजार समितीला बरखास्तीची वेळ आणली आणि वर्षभरात बाजार समिती गट -गटांत विभागली असे नेते तालुक्याचा उध्दार कसे करू शकतील असा सवाल आण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे प्रमुख माधवराव काळभोर यांनी केली आहे.

थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या वेळी माधव अण्णा काळभोर बोलत होते. यावेळी के. डी. कांचन, दिलीप काळभोर, सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, रवींद्र कंद, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, थेऊरचे नवनाथ काकडे, राजाराम कांचन, महादेव कांचन, सनी उर्फ युगंधर काळभोर, लोचन शिवले, लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर, ललिता काळभोर, कमलेश काळभोर, राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.

माधव अण्णा काळभोर म्हणाले की, कै. अण्णासाहेब मगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरु केला आहे. मात्र, २०११ साली कारखान्यावर प्रशासक असताना कारखाना बंद पडला. कारखाना सुरु व्हावा व शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे. कारखाना सुरु करण्यासाठी शासन व इतर बँकांची आर्थिक मदत लागणार आहे. Yashwant Factory

आमच्याकडे कारखान्याचे संस्थापकांपैकी एक असलेले उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः हा कारखाने चालू केले आहेत. त्यांचे कारखाने चांगले काम करीत आहेत. ज्यांच्या कुटूंबीयांनी त्याग केला त्यांनी कारखाना उभा करण्याचा विडा उचलला आहे. अशावेळी सभासदांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. पुढील काळात एकही गुंठा जमीन न विकता कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.

महादेव कांचन म्हणाले की, कारखान्यावर १५ वर्षे याठिकाणी संचालक म्हणून काम केले आहे. एकही मानधन मी घेतले नाही. या वास्तूला माझे दैवत मानतो. परंतु एकत्र आल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. वास्तविक कारखाना वाचावा म्हणून हा प्रयोग केला आहे. आज ज्यांनी विरोधात पॅनेल उभा केला आहे. त्यांनी बाजार समितीत काय केले. त्यांचे काम कसे आहे. हे तालुक्याला ज्ञात आहे. त्यामुळे ज्यांना फक्त सहकारातून स्वार्थ साधायचा आहे. हे कारखाना कशासाठी चालू करायचं म्हणातयंत हे सभासद जाणून आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!