कामाची बातमी! रेशन ई-केवायसीसाठी आज अखेरचा दिवस, आजच ई-केवायसी करा नाहीतर मोफत धान्य होणार बंद, जाणून घ्या…


पुणे : सध्या एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आज, सोमवार ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे चालू ठेवायचा असेल, तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉझ मशीनवर आपला अंगठ्याचा ठसा द्यावा. ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी केले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही.

काही कारणास्तव अंगठ्याचा ठसा घेता येत नसेल, तर दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या आयरिस स्कॅनरद्वारे डोळ्यांचा स्कॅन करूनही ई-केवायसी करता येते. या दोन्ही पर्यायांमुळे लाभार्थ्यांना सोयीचे पर्याय उपलब्ध आहेत. ई-केवायसीसाठी प्रत्येक शिधापत्रिकेतील पात्र लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवणे आवश्यक आहे.

तसेच ज्यांना हे दोन्ही पर्याय शक्य होत नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने घरबसल्या ई-केवायसीची सोयही उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये ‘मेरा ई-केवायसी’ हे अॅप डाउनलोड करावे लागेल. यामध्ये घरी बसूनच आपले ई-केवायसी करू शकतात. यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्डशी त्यांचा मोबाइल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे.

जर मोबाइल नंबर जोडलेला नसेल, तर ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच याशिवाय क्यूआर कोडचा पर्यायही दिला आहे, लाभार्थ्यांना या प्रक्रियेत मदत हवी असल्यास, त्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराशी किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क करू शकता. आज शेवटची मुदत असल्याने वेळ वाया न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group