कामाची बातमी! मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद, सुट्ट्यांची यादी वाचा..


नवी दिल्ली : एप्रिल महिना संपत येत असल्याने, अनेक लोक मे महिन्यात येणाऱ्या बँक हॉलिडेची आतुरतेने वाट पाहत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे २०२५ महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे.

महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये बँका १२ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँकिंग कामांची योजना अगोदरच आखणे आवश्यक आहे. मे महिन्यातील या सुट्ट्यांमध्ये दोन लाँग विकेंडचा समावेश आहे, ज्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे बँकिंग काम असेल तर ते योग्यवेळी पूर्ण करणे गरजेचे आहे.

मे महिन्यातील बँकेतील सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे..

1 मे 2025 – कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन

4 मे 2025 – रविवार

9 मे 2025 – रवींद्रनाथ टागोर जयंती

10 मे 2025 – दुसरा शनिवार

11 मे 2025 – रविवार

12 मे 2025 – बुद्ध पौर्णिमा

16 मे 2025 – राज्य दिन

18 मे 2025 -रविवार

24 मे 2025 – चौथा शनिवार

25 मे 2025 -रविवार

26 मे 2025 – काझी नजरुल इस्लाम जयंती (प्रादेशिक सुट्टी)

29 मे 2025: महाराणा प्रताप जयंती

या यादीवरून लक्षात येते की, मे महिन्यात सलग दोन लाँग विकेंड येणार आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे. सर्व राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या सारख्या नसतात. वेगवेगळ्या सण आणि स्थानिक महत्त्वाच्या दिवसांनुसार प्रत्येक राज्यात सुट्ट्या वेगळ्या असू शकतात. याची अधिकृत माहिती RBI च्या वेबसाइटवर तपासता येऊ शकते. त्यामुळे, संबंधित राज्यातील सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच आपली कामे नियोजित करावीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!