महिलेला तयार करायचं, अनैतिक संबंध असल्याचं कारण सांगायचं!! संतोष देशमुखांच्या हत्येचा कट पोलिसांनीच रंगवला, माहिती वाचून हादरून जालं…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. या प्रकरणात बीड पोलिसांनीच एक कट रचला होता आणि संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, पोलिसांनी कळंब येथे एक महिला तयार ठेवली होती, जिच्या माध्यमातून हत्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे पोलिसांचा हा कट यशस्वी ठरला नाही.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत सांगितले की, कळंब येथे एक महिला तयार ठेवण्यात आली होती आणि संतोष देशमुखांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे वळण देण्याचा कट होता. आता धनंजय देशमुख यांनीही हाच आरोप पुन्हा मांडला आहे.
त्यांनी सांगितले की, संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबमधील एका महिलेच्या घरी नेण्याची योजना होती, ज्यामुळे ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे दाखवता येईल. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही योजना फसली. संतोष देशमुखांना दवाखान्यात नेण्यासाठी अँब्युलन्स कळंबच्या दिशेने नेण्यात आली होती. मात्र जवळच केज येथे रुग्णालय आणि पोलिस स्टेशन होते.
यामुळे गावातील तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला आणि पोलिसांची योजना अयशस्वी ठरली. धनंजय देशमुख यांनी असेही सांगितले की, या प्रकरणातील तपास अत्यंत खोटवडा झाला आहे आणि पोलिसांनी समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.