पुणे महापालिकेसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार ? आघाडी होण्याचे संकेत


पुणे : राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवावी यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.वरिष्ठांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील दोन माजी महापौरांनी यासंदर्भात तासभर खलबत केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ही दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवावी, असा दोन्ही पक्षांमध्ये मतप्रवाह आहे. पुण्यात तरी ही निवडणूक प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी होईल, अशी दाट शक्यता आहे. भाजपला शह द्यायचा असेल तर दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील काही स्थानिक नेत्यांनीही खासदार सुप्रिया केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भाजपला कितपत शह देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष (शरदचंद्र पवार) येत्या काळात महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार सतेज पाटील तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क प्रमुख माजी आमदार सचिन आहीर यांच्याशी स्पष्ट बोलणे झाले आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी महापालिकेत निवडणूक लढवेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

       

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’शी आघाडी केल्यास काँग्रेसने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. अशीच परिस्थिती ठाकरे यांच्या सेनेची आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची अडचण झाली आहे. भाजप ‘राष्ट्रवादी’ला सोबत घेण्यास तयार नाही आणि महाविकास आघाडीत त्यांना स्थान नाही. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील अनेक स्थानिक नेते लढण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे दोन्हीही ‘राष्ट्रवादी’ची आघाडी कोणाच्या अधिक पथ्यावर आहे, यावर या आघाडीचे भविष्य ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!