काळजी घ्या…उन्हाचे चटके वाढणार, भारतीय हवामान विभागाचा महत्वाचा इशारा, राज्यात पुढील 24 तासात..

पुणे : उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात हवामानात बदल होताना दिसले. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उन्हाचे चटके. मात्र, मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच तापमान वाढ दिसत आहे. काही राज्यात अजूनही पाऊस आहे. मात्र, राज्यात आता उन्हाळा सुरू झाला.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहिल. अमरावती शहरात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भात उष्णता सर्वाधिक वाढल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीला आहे. उन्ह वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. शक्यतो दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणे टाळा.

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यत देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मंडी येथे 11.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अमरावती येथे उच्चांकी 39.8 तापमानाची नोंद झाली. अमरावतीमधील तापमान भारतातील उच्चांकी तापमान म्हणून नोंदवण्यात आले. अनेक जिल्ह्यात पारा 38 च्या पुढे होता. यासोबतच राज्यातीत नीचांकी तापमानची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

पुण्यातही तापमान वाढताना दिसत आहे. पुण्यात तापमानाचा पारा 36.8 अंशावर गेला. शहरात शुक्रवारी दिवसभरात या हंगामातील उच्चांकी 36.8°c कमाल तर 15.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शहरात सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढत गेली आणि दुपारी रस्त्यांवरून फिरताना चटके बसत होते शहराबरोबर जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा जाणवला.