शेतकऱ्यांसाठी खुशखबर!येत्या 13 मार्चला खात्यात होणार खडखडाट..; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. आता या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 13 मार्चला 2000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते.त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच हप्ता मिळू शकतो. पीएम किसानचा 22 वा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांना 13 मार्चला खात्यात 2000 रुपये येऊ शकतात. जवळपास 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांसाठी शेतकऱ्यांना ई -केवायसी करणे अनिवार्य आहे. सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे.पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने समजणार आहे. तुम्ही स्टेट्स चेक करु शकतात. त्यावरूनही हप्ता जमा होणार की नाही याची माहिती मिळू शकेल.

पीएम किसान योजनेचा वर्षभराचा निधी 6000 रुपये आहे. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 21 हप्ते दिले गेले आहेत. आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा 22 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारी महिना उलटून गेला आहे तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता लवकरच हाफ्ता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
