TikTok भारतात पुन्हा सुरू होणार? कंटेंट क्रिएटर्समध्ये मोठी उत्सुकता, काय आहे सत्य? जाणून घ्या…


नवी दिल्ली : भारतामध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले TikTok 2020 पासून बंदी घालण्यात आलेले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कंटेंट क्रिएटर्स आणि कोट्यवधी युजर्स नाराज झाले होते. तुम्ही सुद्धा टिक टॉक प्रेमी आहात का? मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, भारतात गेल्या

अनेक वर्षांपासून बंदी असलेल्या टिकटॉकची भारतात पुन्हा एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे. कंटेंट क्रिएटर्स आणि युजर्स या सर्वांनाच टिकटॉकच्या पुनरागमनाच्या बातमीबाबत सत्य जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तुम्हालाही याबाबतचं सत्य जाणून घ्यायचं आहे तर जाणून घेऊयात…

काही युजर्सनी अलीकडेच टिकटॉकची अधिकृत वेबसाईट तपासली असता ती मोबाईल आणि लॅपटॉपवर ॲक्सेस होत असल्याचे समोर आले. तथापि, अनेक युजर्सना अजूनही ही वेबसाईट उघडता येत नाहीये. त्यामुळे वेबसाईट सर्वांसाठी ओपन न करता टेस्टिंग फेजमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घडामोडीमुळे टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप कंपनीकडून किंवा भारत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. भारत सरकारने डेटा प्रायव्हसी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जून २०२० मध्ये टिकटॉकसह एकूण ५८

चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी भारतात टिकटॉकचे तब्बल २० कोटी सक्रिय युजर्स होते. या बंदीनंतर हजारो तरुण कंटेंट क्रिएटर्सना मोठा फटका बसला होता. सध्या टिकटॉकची वेबसाईट पुन्हा ॲक्सेस होऊ लागल्याने त्याच्या पुनरागमनाबद्दलच्या चर्चांना जोर आला असला तरी, कायदेशीर दृष्ट्या भारत सरकारची मंजुरी मिळाल्याशिवाय हे ॲप सुरू होऊ शकत नाही.

भारत-चीन संबंधांमुळे चर्चेला वेग..

अलीकडील काळात भारत-चीन संबंध सुधारताना दिसत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नुकतीच भारत भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या भेटींमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागल्याचे संकेत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!