राज ठाकरेंसोबत युती करणार? उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान, म्हणाले..


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

आज या उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीत आज काही पक्ष प्रवेश झाले. शिवसेना ठाकरे गटातून काही महिन्यापूर्वीच शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह शिवसैनिकांनीदेखील पक्षात प्रवेश केला.

त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले. जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले. मनसेकडून युतीच्या प्रस्तावाची मागणी होत आहे. त्यावर उद्धव यांनी आता आम्ही काही संदेश देणार नाही तर बातमी देऊ असे सूचक वक्तव्य उद्धव यांनी केले.

दरम्यान, या मुद्यावरून आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नसल्याचेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला युतीची टाळी देण्याबाबत स्पष्टता असल्याचेही म्हटले जात आहे.

मनसेसोबतच्या युतीवर उद्धव यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर उद्धव-राज यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर आता मनसेकडून कोणती प्रतिक्रिया येईल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लाग

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!