पुण्यात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला वेळेचं बंधन असणार? पोलीस आयुक्त म्हणाले…


पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दारू विकाल तर सात पिढ्या विसरणार नाहीत अशी कारवाई करू, असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दारू विक्रेत्यांना दिला आहे.

नागरिकांचे सहकार्य लाभल्यास विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. यावर्षीचा गणेशोत्सव पूर्णपणे निर्बंधमुक्त आणि भयमुक्त असेल, याची खात्रीही त्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत नियोजनात कमतरता होती, हे आम्ही मान्य करतो, असं सांगतानाच यंदा योग्य वेळी तयारी करून शिस्तबद्ध आणि वेळेत मिरवणूक संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं कुमार यांनी स्पष्ट केलं. आपण सर्वांनी एक नवीन परंपरा सुरू करू या, असं आवाहन करत त्यांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी दारूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवावीत, अशी स्पष्ट सूचना आयुक्तांनी केली आहे. दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.जो दुकान उघडं ठेवेल, त्याला पुढची सात पिढ्याही दारू विकता येणार नाही, असा इशारा देत, त्यांनी पोलिसांना दारू पिऊन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवर तत्काळ अ‍ॅक्शन घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, याशिवाय शर्ट काढून नाचणे, दारू पिऊन गोंधळ घालणे हे यंदा खपवून घेतले जाणार नाही, असं स्पष्ट करत, नाचणाऱ्यांचे व्हिडीओ तयार करणे आणि प्रबोधन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!