राज्यात थंडीचा लाट येणार काय ? काय सांगतोय पंजाबराव डक यांचा अंदाज !!
Havaman Andaj । निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान (Heavy Rain) घातले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain Update) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट झाली आहे.
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी महाराष्ट्राच्या हवामानबद्दल नवीन अंदाज वर्तवला आहे. राज्याचे 25 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील. शिवाय कोरड्या हवामानामुळे तापमानात देखील कमी झाल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे राज्याला थंडीची लाट अनुभवायला मिळेल. इथून पुढे राज्यात पाऊस (Rain Update) पडणार नाही. गहू आणि हरभरा या पिकांसाठी हे हवामान चांगले असेल.
राज्यात 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. या हवामानामुळे गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सर्वांना सहन करावा लागतो. यंदा राज्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यात त्याने काही ठिकाणी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पाठ फिरवली. पावसाच्या या लपंडावामुळे नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर संकट आले आहे