डिसेंबर मध्ये सोन्याची किंमत ‘इतकी’ होणार, वाढणार की घटणार?, सोन्याच्या किमती बाबत मोठा दावा आला समोर..

नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे आणि त्यातच जागतिक बाजारात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नुकतेच सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति १- ग्रॅम १ लाख रुपयांवर पोहोचून खाली आले आहेत. देशातील प्रत्येक मोठ्या शहरात सोन्याच्या किमती दररोज बदलत असतात.
तसेच २२ एप्रिल २०२५ रोजी इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर पोहोचले. या दिवशी या मौल्यवान धातूची किंमत १ लाख१ हजार ३५० रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. खरे तर, फेब्रुवारी-मार्च मध्ये अनेकांच्या माध्यमातून सोन्याच्या किमती लवकरच एका लाखाच्या वर जाणार असे बोलले जाऊ लागले होते.
दरम्यान, एवढ्या लवकर एका लाखाच्या वर जाणार असे कोणालाच वाटले नाही. २२ एप्रिलला सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचले मात्र तेवढ्याच झपाट्याने याची किंमत कमी पण झाली. २३ एप्रिल ला सोन्याची किंमत ३००० रुपयांनी कमी झाली.
यानंतर जवळपास २८ एप्रिल पर्यंत सोन्याच्या किमती दबावात पाहायला मिळाल्या. २९ एप्रिलला सोन्याची किंमत ४४० रुपयांनी वाढली मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत आता घसरण सुरू झाली आहे. काल अर्थातच एक मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत २१८० रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
जाणकार लोक सांगतात की, सोन्याची किंमत भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून असते. दरम्यान आता वेगवेगळ्या तज्ज्ञांचे वेगवेगळे दावे सुद्धा समोर आले आहेत. सोन्याच्या किमतीबाबत जॉन मिल्सचा असा विश्वास आहे की, भविष्यात राजकीय परिस्थिती सामान्य होईल आणि जेव्हा बाजारातील परिस्थिती सुधारेल तेव्हा गुंतवणूकदार बाजारात परत येतील, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत घट होईल.
एवढेच नाही तर सेंट्रल बँक देखील त्यांचा सोन्याचा साठा स्थिर ठेवेल किंवा तो कमी करेल, ज्यामुळे, वाढत्या पुरवठ्यामुळे आणि कमी मागणीमुळे, सोने प्रति औंस १८०० डॉलर पर्यंत खाली येऊ शकते, म्हणजेच, भारतीय बाजारानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत घसरू शकते. दुसरीकडे, गोल्डमनने या उलट अंदाज लावलेला आहे. गोल्डमनच्या मते, सोन्याची किंमत आगामी काळात सुद्धा अशी वाढतच राहणार आहे.