अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यांना हॉस्पिटल उपचारांनी जोडणार….


उरुळी कांचन : अष्टापूर फाटा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा त्यांच्या जवळच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा भव्य शुभारंभ सोहळा सोमवारी (ता. 31) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे.

‘श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटल, उरुळी कांचन’ या नव्या रुग्णालयाचे निमंत्रक असून, या आधुनिक हॉस्पिटलमुळे अष्टापूर, पिंपरी सांडस, वाघोली-राहू रोड आणि पूर्व हवेली परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक सोय होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, प्रमुख पाहुणे दौंडचे आमदार ॲड. राहुलदादा सुभाष कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात जिल्हा बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप दादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश दादा जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष आप्पा जगताप, जिल्हा परिषद सदस्य सागर आबा शेलार, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन तसेच परिसरातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदर हॉस्पिटलचे उद्घाटन आर्या हाइट्स, पिंपरी सांडस, वाघोली-राहू रोड, अष्टापूर फाटा, ता. हवेली, जि. पुणे या ठिकाणी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.

दरम्यान, या नव्या आरोग्यसेवा पर्वाच्या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल प्रसंगाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटल, उरुळी कांचन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!