लाडक्या बहिणींना सरकार देणार मोठं गिफ्ट? योजनेबाबत आली मोठी बातमी, मिळणार इतके पैसे…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार वाहत आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती.
त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या योजनेतील पैशांना ब्रेक लागला होता, तरी देखील सरकारने मध्यंतरी नोव्हेंबरचा हाफ्ता लाभार्थी महिलांना वितरीत केला, मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार याकडे आता लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार आता या योजनेतील लाभार्थी महिलांची सक्रांत गोड होणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोनही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १४ किंवा १५ जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र या माहितीला अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.