महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? टायगरवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठ्या नेत्याची थेट राज्यपलांकडे मागणी


मुंबई : काल अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याने एकच खळबळ उडाली. बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्याने राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले आहे. याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेणे आणि बिश्नोई गँगशी संबंध तपासणे हे प्रमुख आव्हान आहे. असे असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे. ते म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झालं आहे. काल झालेला गोळीबार याला जंगलराज म्हणतात. कायद्याचं राज्य कोसळलं आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून क्रम पाहिला तर तुम्हाला कळेल.

पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी हत्या आणि गोळीबाराचे सत्र सुरू आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे. विरोधकांना खोट्या गुन्ह्यात टाकण्यासाठी गृह खातं वापरले जात आहे. माफिया टोळ्या मोकाट आहेत. यांना राज्य चालवता येत नाही. हे जंगल राज आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे.

राज्यपालांनी केंद्राकडे तशी शिफारस केली पाहिजे, असेही ते म्हणाले. तसेच अंडरवर्ल्डचा जो काळ होता, तोच परत आला आहे. गँगवार, खंडणी, धमक्या, भररस्त्यावर गोळीबार किडनॅपिंग या गोष्टी परत फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांच्या राज्यात सुरू झाल्या आहेत. काल टायगरवर हल्ला झाला. गर्दीत समोरासमोर हल्ला झाला.

त्याआधी बाबा सिद्दीकींची हत्या, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला, पूर्णेकरांची हत्या झाली, यामुळे परिस्थिती बिघडली आहे. एकनाथ शिंदे काल ताबडतोब टायगरच्या घरी गेले. फक्त रडायचे बाकी होते. पण हेच शिंदे त्यांच्या घरासमोर पूर्णेकरांची हत्या होऊनही तिथे गेले नाही. कलाकार, उद्योगपतींवर गोळ्या चालवल्या जातात, तेव्हा त्यांची काळजी यांना आहे.

त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे. राज्यपालांनी केंद्राकडे तशी शिफारस केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे हल्ले थांबणार की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!