Pune News : लग्नानंतर बायकोचं वजन वाढलं अन् पतीची सटकली; 7 महिने अमानुष छळ, अखेर पोलिसांनी शिकवला धडा


पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातून कौटुंबिक छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचे वजन जास्त असल्याच्या कारणावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्कर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेच्या वजनावरून तिला सतत टोमणे मारले जात होते. तसेच वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा दबाव टाकत त्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप तिने केला आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. काही वेळा तिला घरात एकटे सोडून अन्न-पाण्याविना ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पतीकडून मारहाण व शिवीगाळ होत असल्याचे, तसेच सासू आणि नणंद यांच्याकडूनही त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत लष्कर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!