उन्नत मार्गावरचे भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय नाही; इनर रिंग रोड, उन्नत मार्ग ,रेल्वे भूसंपादन प्रकल्पांसाठी प्रशासनाशी बैठका घेणार -आ. ज्ञानेश्वर कटके


उरुळीकांचन : हडपसर ते यवत तसेच विमाननगर ते शिरुर पर्यंत विकसित होणाऱ्या उन्नत मार्गाला शेतकऱ्यांना निश्चित मोबादला ,निश्चित संपादित क्षेत्र तसेच जुन्या मोबदल्याचे अवॉर्ड ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांना अवगत झाल्याशिवाय जमीन भूसंपादन प्रक्रिया होणार नसून शेतकऱ्यांची संबंधित प्रशासनाची बैठक घेऊन समाधानकारक तोडगा झाल्याशिवाय या दोन्ही मार्गावरचे भूसंपादन होणार नसल्याची ग्वाही आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.

कुंजीरवाडी (ता.हवेली) येथे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी रविवार (दि.११)आयोजित केलेल्या जनता दरबार कार्यक्रमात बाधित शेतकऱ्यांनी आ. ज्ञानेश्वर कटके यांची भेट घेऊन भूसंपादन प्रक्रियेतील संपादित क्षेत्र, उन्नत मार्गाची एकूण हद्द तसेच मोबादला व जुन्या मोबदल्यासंदर्भात प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना अवगत करावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात झालेल्या शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत प्रशासनाशी चर्चा करुन शेतकऱ्यांशी बोलणी झाल्याशिवाय मोबादल्याचे निश्चित आश्वासन मिळाल्याशिवाय प्रकल्पाचे भूसंपादन होणार नाही असे आ. कटके यांनी अश्वासित केले आहे.

आ. ज्ञानेश्वर कटके म्हणाले, हवेलीत उन्नत मार्ग, पुणे शहराचा पीएमआरडीए रिंग रोड व पुणे – दौंड रेल्वेमार्गावर रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करताना बाधित शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला या सर्व भूसंपादन प्रक्रियेवर शेतकऱ्यांशी प्रशासनाशी संपूर्ण चर्चा झाल्याशिवाय भूसंपादन होणार नाही. या भूसंपादन प्रक्रियेत मोजणी तसेच सर्व्हेक्षण प्रक्रिया शेतकऱ्यांना मोबादल्याची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय होणार नाही. या तिन्ही भूसंपादन प्रक्रियेत संबंधित प्रशासनाशी प्रकल्प निहाय मेळावे घेणार असून शेतकऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय प्रकल्प पुढे होणार असे शेतकऱ्यांना अश्वासित करण्यात आले आहे.

कचरा प्रकल्पाचा थेऊरकरांचा विरोध

पूर्व हवेलीत सोलापूर रस्त्यावरील गावांसाठी पीएमआरडीए कडून १५० टन (TDD)कचरा विघटन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.मात्र कचरा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर थेऊरकरांनी हा प्रकल्प थेऊरमध्ये करण्यास आ.ज्ञानेश्वर कटके यांना भेटून विरोध केला असून ग्रामस्थांच्या भावना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.

वळती फिडरचा बिघाडाचा प्रश्न मार्गी लावू

वळती फिडरवर वाढत असलेल्या अतिरिक्त विजेच्या दाबाने फिडरची वाहनी सातत्याने नादुरुस्त होत असून विजेचा खंडीत पणा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वळती फिडरवरचा दाब विभागून अखंडीतपणे विजपुरवठा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे आ. कटके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!