माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं? शेजारणीसोबत जोरदार राडा, रस्त्यावर तुंबळ हाणामारी…


मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोशल मीडिया वादाने थेट रस्त्यावर हाणामारीचा रंग घेतला. कारण एवढंच, “माझ्या नवऱ्याला तू इन्स्टाग्रामवर फॉलो का केलंस?” हा हाय-व्होल्टेज ड्रामा बुधवारी ८ ऑक्टोबरच्या रात्री आंबेडकरनगरच्या गल्लीमध्ये झाला.

सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, शेजारच्या महिलेने आपल्या पतीला इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याच्या संशयावरून ही लढाई पेटली. ‎‎३१ वर्षीय फिर्यादी महिला घरासमोर उभी असताना शेजारची महिला तिच्यावर तुटून पडली.

“माझ्या नवऱ्याला तू फॉलो का केलंस?” असा थेट सवाल तिने केला. फिर्यादीने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, “अगं, मी काही फॉलो केलं नाही, उलट तुझ्या नवऱ्यानेच मला फॉलो केलंय!” पण समोरची बाई ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हती.

       

मग काय, शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि काही वेळातच ती थेट मारामारीत बदलली. मुख्य आरोपी महिलेसोबत तिची नणंद आणि आणखी एक मैत्रीणही होती. या तिघींनी फिर्यादीला शिव्या दिल्या आणि नणंदेने तर चक्क दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर हाणला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाली.

‎‎दरम्यान, या राड्यामुळे गल्लीत एकच गर्दी जमली. फिर्यादीचा भाऊ तिथे पोहोचला आणि त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सिडको पोलिसांनी तक्रार दाखल करून मुख्य आरोपीसह त्या दोन महिलांवर गुन्हा नोंदवला आहे. हवालदार विद्या राठोड आता या प्रकरणाचा तपास करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!