स्मृती मानधनाच लग्न नेमकं का मोडलं? पलाशचे फ्लर्टिंगचे मेसेजेस व्हायरल, मेरी डिकोस्टाने केला गौप्यस्फोट

मुंबई : लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झालेल्या भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनासाठी सर्वकाही एका क्षणात बदललं. 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल लग्न करणार होते. परंतु लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने विवाह विधी पुढे ढकलण्यात आली.

त्याच्या दुसऱ्या दिवशी पलाशसुद्धा आजारी पडला आणि त्यालाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. या सर्व घडामोडींदरम्यान कोरिओग्राफ मेरी डीकोस्टाने पलाशसोबतचे फ्लर्टिंगच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर करताच एकच खळबळ उडाली आहे.

मेरी डिकोस्टा नावाच्या कोरिओग्राफरच्या नावाने पलाशसोबतचे चॅट्स व्हायरल झाले होते. या चॅट्समध्ये पलाश तिला सतत मेसेज करताना, फ्लर्ट करताना दिसत होता. त्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशिपमध्ये फूट पडली का, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

अखेर अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मेरी डिकोस्टा स्वतः समोर आली असून तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे महत्वाची पोस्ट शेअर केली आहे. चॅट्स व्हायरल झाल्यावर पलाशविरोधात नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. स्मृतीच्या चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला. मात्र आता मेरी डिकोस्टाने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेला नवीन वळण मिळालं आहे.
हा मुद्दा लक्षात घ्या: मी त्याला कधीच भेटले नाही, असं ती स्पष्टपणे म्हणाली आहे. म्हणजेच भेट नसतानाही पलाशने तिच्या डीएममध्ये मेसेज कसे केले? आणि तो स्वतः एका स्थिर नात्यात असूनही तीच्याशी फ्लर्ट का करत होता? या प्रश्नांची सरबत्ती नेटकऱ्यांकडून सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये पलाश तिला पोहायला जाण्याचं सांगतो, तर तिच्या नात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं टाळतो. उलट भेटण्यासाठी तिने होकार द्यावा, यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो. त्यामुळे हे मेसेज ‘फेक’ की ‘रियल’? यावरही सोशल मीडियावर वादंग सुरू आहे. कारण मेरीने आता दिलेला यू-टर्न अनेकांना संशयास्पद वाटत आहे.
