नवीन लेबर कोडचे नियम आहेत फायदेशीर! आता 7 तारखेपर्यंत पगार, नोकरी सोडली लेऑफ केल्यावर 2 दिवसांत….


मुंबई : तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. एप्रिल 2026 पासून नवीन कामगार कायद्यातील तरतुदी लागू झाल्या आहेत. पण नवीन कायद्याच्या अंमलबजावणीपासून पगारदार कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार क्रेडिट करण्याच्या वेळेपासून अनेक बाबींबाबत अनिश्चितता पाहायला मिळत असून यापैकी सॅलरीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.

यामध्ये आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार उशिरा मिळत असेल किंवा नोकरी सोडल्यानंतर फुल आणि फायनल मोबदला मिळण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागत असेल, तर ही दिलासादायक बातमी आहे. नवीन कामगार नियमांनुसार नियोक्त्यांना महिना संपल्यानंतर 7 दिवसांच्या आत आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणे बंधनकारक आहे.

तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिफ्टच्या शेवटी, साप्ताहिक कामगारांना रजेपूर्वी आणि पाक्षिक कामगारांना पंधरवडा संपल्यानंतर 2 दिवसांच्या आत पगार देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्याला कंपनीला पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार द्यावा लागेल. रोजंदारीवरील कामगारांना काम पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी पैसे द्यावे लागतील.

तसेच विकली पगार मिळत असेल तर त्यांना साप्ताहिक सुट्टीपूर्वी पगार दिला गेला पाहिजे. पंधरवड्याच्या आधारावर म्हणजेच दर 15 दिवसांनी पगार मिळतो, त्यांना 2 दिवसांच्या आत पेमेंट करावे लागेल. यामुळे हे फायदेशीर ठरणार आहे. तसेच नोकरी सोडणाऱ्या किंवा कामावरून हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत लागू होतो.

अशा प्रकरणांमध्ये कंपनीला 2 कामकाजाच्या दिवसांच्या आत F&F रक्कम देणे बंधनकारक असेल. याआधी अनेक कर्मचाऱ्यांना देय रकमेसाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागायची. यामुळे वेळ वाया जात होता. तसेच आता कर्मचाऱ्यांना थकीत वेतनावर दावा करण्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कालावधी मिळेल, तर याआधी विविध कायद्यांनुसार 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!