मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या संपत्तीचा आकडा…

नवी दिल्ली : भारत आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नावांची जेव्हा चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे नाव आघाडीवर असते. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, मुकेस अंबानी हे जगातील १७वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८६.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

मुकेश अंबानी हेच नाही तर त्यांची तिन्ही मुले सुद्धा श्रीमंत आहेत. मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मुकेश अंबानी यांनी वेळेनुसार तिघांमध्ये काम विभागले आहे. तीन मुलांमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे ते जाणून घेऊयात…
ईशा अंबानी

ईशा अंबानी या मुकेश अंबानी यांच्या कन्या आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बोर्डात नॉन-एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच, रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स फाउंडेशनच्या एग्झिक्युटिव्ह लीडरशिप टीमच्या त्या प्रमुख सदस्या आहेत. ईशा अंबानी टीरा ब्युटीच्या एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि को-फाउंडर देखील आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानींचं वार्षिक उत्पन्न सुमारे ४.२ कोटी रुपये आहे, आणि त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ८०० कोटी रुपये आहे.

आकाश अंबानी
आकाश अंबानी हे मुकेश अंबानी यांचे मोठे पुत्र असून ते रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आहेत. याव्यतिरिक्त, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत आहेत. आकाश अंबानी यांचा वार्षिक पगार सुमारे ५.६ कोटी रुपये आहे, आणि त्यांची एकूण संपत्ती 40.1 अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे ३,३२,८१५ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
अनंत अंबानी
अनंत अंबानी हे मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान पुत्र आहेत. ते रिलायन्स जिओमध्ये ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्रांचे कामकाज पाहतात. तसेच, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डवर ते डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. अनंत अंबानी यांना वार्षिक ४.२ कोटी रुपये पगार मिळतो, आणि त्यांची एकूण संपत्ती ४० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३,३२,४८२ कोटी रुपये आहे.
सर्वात श्रीमंत कोण?
मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांमध्ये आकाश अंबानी हे सर्वात श्रीमंत आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ४०.१ अब्ज डॉलर्स आहे. अनंत अंबानी ४० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ईशा अंबानी ८०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी वेळोवेळी आपल्या मुलांना त्यांच्या व्यावसायिक वाटचालीत मार्गदर्शन आणि मदत करत असतात.