दिल्लीच्या मैदानात अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का देणारे प्रवेश वर्मा आहेत तरी कोण? जायंट किलर ठरल्याने देशात सुरुय चर्चा…


नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत आज लागलेल्या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपने मोठी मुसंडी मारली. दिल्ली मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. केजरीवाल ३१८२ मतांनी पराभूत झाले आहेत.

यामुळे दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडत आहेत. यामुळे केजरीवाल यांचा पराभव करणारे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव आघाडीवर असणारे प्रवेश वर्मा कोण आहेत? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.

त्यांचे शिक्षण एमबीए आहे. स्वाती सिंग या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष योगेंद्र शास्त्री यांचा त्यांनी पराभव केला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती. २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते. १ सप्टेंबर २०१४ पासून ते नगरविकास स्थायी समितीचे सदस्य आहेत.

तसेच ते संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांवरील संयुक्त समिती आणि शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे म्हणून त्यांची एक ओळख आहे. त्यांची बरीच चर्चा होत असते.

दरम्यान, प्रवेश वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाने मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे प्रवेश वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!