काँग्रेसने केलेल्या आरोपाला शरद पवार काय उत्तर देणार.? मोठी माहिती आली समोर

मुंबई : राज्यात चालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, गेल्या आठ-दहा दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे.
दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात सुमारे १००० लोकांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली.
पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडला भेट देणार आहे.
तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना शरद पवार उत्तर देतील, असे मानले जात आहे.
खरे तर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या दोघांनाही भाजपकडून कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
या ऑफरसाठी अजित आणि शरद यांच्यात गुप्त बैठक झाल्याचा चव्हाणांचा दावा आहे.गेल्या शनिवारी पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरी काका-पुतण्याची बैठक झाली होती.
दरम्यान दोघेही गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एका मंचावर दिसले होते.