घरात सोने ठेवण्याची मर्यादा किती? विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी नियम काय? जाणून घ्या…

मुंबई : आपल्या देशात सोने खरेदी करून ते घालणारे हौशी लोकं आहेत. लग्नाच्या निमित्ताने लोक सोन्याला विशेष महत्त्व देतात. मात्र, घरात किती सोने बाळगता येते यावर आयकर विभागाने काही विशिष्ट नियम आखून दिले आहेत. मात्र हे नियम अनेकांना माहित देखील नाहीत. यामुळे अनेकदा अडचण निर्माण होते. तसेच कारवाईला सामोरे जावे लागले.
त्यामुळे कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये विवाहित महिला ५०० ग्रॅम सोने बाळगू शकतात, तर अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा २५० ग्रॅम आहे. नियमानुसार विवाहित आणि अविवाहित पुरुषांसाठी मात्र ही मर्यादा केवळ १०० ग्रॅम इतकी आहे.
जर या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सोने सापडले आणि त्याचा उत्पन्नाचा स्रोत योग्यरीत्या स्पष्ट करता आला नाही, तर आयकर विभाग त्यावर कारवाई करू शकतो, असा हा नियम आहे. तुम्ही खरेदी केल्यानंतर तीन वर्षांच्या आत सोने विकले तर त्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर (Short-term Capital Gains Tax) लागतो.
जर सोने तीन वर्षांनंतर विकले तर दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long-term Capital Gains Tax) लागू होतो, जो २०% आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना हा कर महत्त्वाचा ठरतो. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे अनेकदा नियम माहिती नसल्याने अडचण निर्माण होते.
दरम्यान, भौतिक सोन्याव्यतिरिक्त डिजिटल सोने खरेदी करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. एका दिवसात २ लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल सोने खरेदी करता येते. यामुळे ही माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर कारवाई होण्याची शक्यता असते.