शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार नेमकं काय म्हणाले.? दादांच्या उत्तराने चर्चा सुरू…
मुंबई : सध्या राजकारणात सगळीकडे राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत, वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षामध्ये फूट पडत नाही, असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नो कॉमेंट्स एवढंच अजितदादा म्हणाले. ‘आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व न देता कामाने उत्तरे द्यायचं ठरवलंय, असे अजित पवार म्हणाले.
सत्तांतर झाले त्याला बरेच दिवस झाले. त्यानंतर अमित शाहांच्या उपस्थित कार्यक्रमात मी आलो होतो. पण पिंपरी चिंचवडचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, दादा तुम्ही लवकर या, म्हणून आज आलो. मला विकास कामांमध्ये लक्ष घालायला आणि विकास करायला मला आवडतं. ते माझं पॅशन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळं आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही टॉप पाचमध्ये आहे. आता टॉप तीनमध्ये अर्थव्यवस्था आणायचं उद्दीष्ट आहे. आर्थिक राजधानी असणारी महाराष्ट्राचंसुद्धा यात योगदान देत आहे. बाकीच्या आरोप प्रत्यारोपांना महत्व न देता आम्ही कामाने उत्तरे द्यायचे ठरवले असल्याचे म्हणत मोदींच्या कामाचे त्यांनी पुन्हा एकदा कौतुक केले आहे.