मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत रक्कम खात्यावर आली नसेल ! सरकारने महिलांना काय करावे म्हणून केले हे आवाहन….

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’तून महिलांना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. काल पुण्यात बालेवाडीत माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या बचत खात्यावर रक्कम जमा झाली आहे. तसेच पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. ज्यामुळे आता योजनेला बराच प्रतिसाद मिळत आहेत. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बैंक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमके काय करावे, यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.
– तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला . तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बैंक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
– बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
– तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे, त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
– आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बैंक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.
– बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेत 500 किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते.
– काही कारणास्तव तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तुमच्या अर्जाच्या समोर पेडिंग, रिव्हुव्ह, डिसअप्नुव्हड असे दिसत असेल तुमच्या अर्जाची छाननी सुरु आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांना लवकरच योजनेचे पैसे मिळणार आहेत.